Summary |
माणसाला मुक्ती कशापासून हवी असते? भय, चिंता आणि क्रोधापासून. ही मुक्ती मिळवली, तर जीवन आनंदी होईल आणि इतरांसाठी प्रेरणादायी बनेल असे लेखक सरश्री सांगतात. या तिन्ही भावनांपासून मुक्ती कशी मिळवायची याचं मार्गदर्शन पुस्तकाच्या तीन भागांतून केलं आहे. भयं म्हणजे काय, भयाचे प्रकार, भयमुक्तीचा मंत्र, मृत्यूच्या भयापासून मुक्ती, कल्पनाशक्तीचे मंत्र याबाबत माहिती दिली आहे. क्रोध या विभागात क्रोधापासून कसे वाचावे, क्रोधाची कारणे, क्रोधापासून मुक्तीचे उपाय त्यांनी सांगितले आहेत. विवेकी विचारांचं महत्वही त्यांनी पटवून दिलं आहे. निर्भय, आनंदी, चिंतामुक्त जीवनाचा मंत्र पुस्तकात सांगितला आहे.
|